Swara Vs Kangana : हिंदुत्ववाद्यांची तालिबानींशी तुलना केल्यानं स्वरा भास्करवर कंगना रनौतची टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Aug 2021 01:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअफगाणिस्तानातल्या तालिबानींच्या जुलमी राजवटीची जगभरात चर्चा सुरू असताना त्यावरून बॉलिवूडमधल्या दोन अभिनेत्रींमध्ये सोशल मीडियात वॉर सुरू झालंय. आपण तालिबानी दहशतवादाविरोधात बोलत आहोत, पण हिंदुत्ववादी दहशतवादावर आपण जाहीरपणे भाष्य करत नाही, त्यावरही आक्षेप नोंदवायला हवा अशी टीका स्वरा भास्करनं केली आणि तिला उत्तर देताना कंगना रनौतनं प्रत्युत्तर दिलंय. हिंदुत्ववाद्यांची तुलना तालिबानींशी केल्यानं स्वरा भास्करवर सोशल मीडियात जोरदार टीका होतेय. त्यातच स्वरा विरुद्ध कंगना असा सामनाही सुरू झालाय.