Rhea Chakrabort | रिया चक्रवर्ती बॉलिवूडमध्ये लवकरच कमबॅक करणार, पुढील वर्षी येणार चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज केसमध्ये अटक झालेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती 2021 सालाच्या सुरुवातील बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीचा जवळचा मित्र रुमी जाफरी याने एका मुलाखतीत ही माहिती दिली.

दिग्दर्शक आणि लेखक रुमी जाफरी यानं सांगितलं की प्रत्येकाला हे वर्ष वाईट गेलंय, रियालाही या वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय. रुमी जाफरी म्हणाला की, "एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला एक महिना तुरुंगात काढावा लागला. या गोष्टीचा तिच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे."

रुमी जाफरी पुढे म्हणाला की, "पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला रिया बॉलिवूडमध्ये कमबॅक करेल. ती ज्या परिस्थीतीतून गेलीय त्यानंतर तिच्यावर आपण आरोप करु शकत नाही." रिया चक्रवर्तीची तुरुंगातून सुटका झाली होती. तेव्हा रुमी जाफरीने तिची भेट घेतली होती आणि तिला बॉलिवूडमध्ये पुन्हा परतायला सांगितलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola