SSR Suicide case | पाटण्याच्या एसपींना क्वॉरन्टाईन करणं योग्य की अयोग्य?
Continues below advertisement
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबईत दाखल झालेल्या बिहार पोलिसांना रोज नवनव्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी मुंबईत दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक (शहर) बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वॉरन्टाईन केलं आहे. गोरेगाव येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. बिनय कुमार यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरन्टाईनमध्ये राहावं लागेल. मात्र यावरुन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री महापालिकेचा उपयोग या कामासाठी करीत असून याबाबत आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
Continues below advertisement
Tags :
T Sushant Singh Rajput Suicide Case Sushant Singh Rajpu Vinay Tiwari Patna SP Bmc Mumbai Police