Sidharth Shukla Passes Away : सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSidharth Shukla Death : बिग बॉस फेम आणि हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं आहे. परंतु मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हृदय विकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खंर कारण कळू शकेल. मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बिग बॉसच्या तेराव्या सिझनचा विजेता म्हणून सिद्धार्थ नावारुपाला आला. खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून सिद्धार्थ झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्यानं सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळं टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकूल आहेत.
सिद्धार्थच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला असं बोललं जात असतं ती शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल, असं सांगितलं जात आहे. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून मिळाली. त्यानंतर सिद्धार्थनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.