Salman Khan Airport : चौकशीसाठी सलमान खानला आत जाण्यापासून रोखलं, CISF जवानाचं सोशल मीडियावर कौतुक

बॉलिवूड स्टार सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान आणि कतरिना नुकतेच चित्रपटाच्या शूटिंगसाठी रशियाला रवाना झाले आहेत. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात सलमान विमानतळावर दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या विमानतळावरील केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाची होत आहे. या जवानाने सलमान खानला चौकशीशिवाय आत जाण्यापासून रोखले.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोक सीआयएसएफ जवानाचे खूप कौतुक करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola