Salman Khan | रेकी करुन सलमान खानच्या हत्येचा कट, पोलिसांकडून शार्पशूटरला बेड्या

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. शार्प शूटर असलेल्या आरोपीने सलमानची माहिती गोळा करण्यासाठी रेकी केली होती. सलमान खान कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. ही टोळी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधून संचालित होते.

सूत्रांच्या माहितीनुसार फरीदाबाद पोलिसांनी भिवानी जिल्ह्यातील असलेल्या 27 वर्षीय राहुल संगा उर्फ बाबाला अटक केली. सध्या तो उत्तराखंडच्या हिस्सारमध्ये राहत होता. अनेक गुन्ह्यांमध्ये तो सहभागी होता. त्याला चौकशीसाठी फरीदाबाद इथे आणण्यात आलं होतं. कारण एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वरवर जप्त करण्यात आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola