Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद
Saif Ali Khan Stabbed : अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा चाकू हल्ला झाल्यानंतर तो रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारी मध्यरात्री सैफ अली खानच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात हल्लेखोराने अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सैफ अली खान चोरासोबत झालेल्या झटापटीत जखमी झाला. यानंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान वडिलांना घेऊन रुग्णालयात गेला. सैफला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सैफ अली खान कारने नाही तर रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.
जखमी सैफ रिक्षाने रुग्णालयात पोहोचला
आलिशन गाड्या दारात उभ्या असतानाही सैफ अली खान रिक्षाने रुग्णालयात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. एनडीव्हीच्या वृत्तानुसार ही महिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर अवघ्या काही अंतरावर राहत असलेला त्याला मुलगा इब्राहिम घटनास्थळी पोहोचला. यानंतर ड्रायव्हर नसल्या कारणाने सैफ अली खानला रिक्षातून रुग्णालयात न्यावं लागलं. याच कारणामुळे आलिशान गाड्या दारात उभ्या असतानाही सैफ अली खानला रिक्षाने रुग्णालयात जावं लागलं.
दरम्यान, सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय.