Web Exclusive : पॉर्नोग्राफी प्रकरणात Raj Kundra यांना जामीन मंजूर; Sherlyn Chopra म्हणते...
Pornography Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्राला (Raj Kundra) अखेर मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. सोमवारी राज कुंद्रासह त्याचा सहकारी आणि आयटी प्रमुख रायन थॉर्प यांना कोर्टानं 50 हजारांचा जामीन मंजूर केला. मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन या दोघांनी गुरूवारी अर्ज मागे घेतला होता. मुंबई पोलिसांकडून नुकतच न्यायालयात याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्याचाच आधार घेत कुंद्रा आता मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात नव्यानं जामीनासाठी याचिका दाखल केली होती. आरोपींविरोधातील तपास पूर्ण झाला आहे, त्यांच्याकडनं आता हस्तगत करण्यासारख काहीच नाही, तसेच आता त्याच्या कोठडीची गरज नाही. असा दावा त्यांच्यावतीनं त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी कोर्टात केला. तसेच आरोपींवर जी कलमं लावण्यात आलीत त्यात सात वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद नाही. या गोष्टी ग्राह्य धरत मुंबईतील किला कोर्टानं या दोघांना जामीन मंजूर केला. यावर शर्लिन चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे.