NCB Investigation | दीपिका, श्रद्धा आणि साराची आज चौकशी; आणखी कुणाकुणाची नावं समोर येणार?
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. उद्या (26 सप्टेंबर) दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे.
ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
Tags :
SSR Suicide Case NCB Rakul Preet Singh Shraddha Kapoor Sara Ali Khan Deepika Padukone Sushant Singh Rajput Rhea Chakraborty Drugs Bollywood Drugs Connection