Sushant Singh Suicide Case | सीबीआयकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा, विशेष चौकशी समितीही गठीत

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अधिकृत सूचना मिळाल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. बिहार सरकारच्या विनंतीवरून सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने आज गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सैम्युएल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात संदर्भात रिया चक्रवर्ती आणि इतर सहा लोकांन विरोधात गुन्हा नोंदवला. तर ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रिंग संदर्भात गुन्हा नोंदवत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे ज्यासाठी उद्या रिया चक्रवर्तीला ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola