Rhea Chakraborty | रिया चक्रवर्तीसह सर्व 6 आरोपींचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळले
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आलं आहे. रियाचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयने फेटाळला आहे. रियासह तिचा भाऊ शोविक तसेच मिरांडा आणि दीपेशसह आठ जणांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन दिवसांच्या सुनावणीनंतर आज कोर्टाने जामिनावर निकाल दिला. या प्रकरणात अनुज केसवानी व्यतिरीक्त इतर आरोपींना बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 28 ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या अमली पदार्थविरोधी पथक(एनसीबी)च्या विशेष पथकाने शोविक, मिरांडा आणि दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अंमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन जप्त केले होते. याप्रकरणात मंगळवारी एनसीबीकडून ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली रियालाही अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयानं रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत तिचा जामीन अर्जही फेटाळून लावला.
Tags :
Court Rejects Bail Drug Connection SSR Case NCB Sushant Singh Rajput Showik Chakraborty Rhea Chakraborty Mumbai