Padma Shri | गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यास मनसेचा विरोध | ABP Majha
गायक अदनान सामीला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराला मनसेने विरोध केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन अदनानला जाहीर झालेल्या पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध केला आहे. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत असल्याचं त्यांनी ट्विट केलं आहे.