मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षयविरोधात बलात्कार, फसवणूक,जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय विरोधात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिथुन आणि योगिता बाली यांचा पुत्र महाक्षयविरोधात याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.