Kangana Ranaut Twitter Suspended : अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Continues below advertisement

मुंबई: आपल्या वादग्रस्त ट्वीट्समुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कंगनाने आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यावर आता ट्विटरने कारवाई करत तिचे अकाऊंट सस्पेंड केले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती. 

देशातील वेगवेगळ्या मुंद्द्यावरून कंगना सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत होती. शेतकरी आंदोलनापासून ते नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालावर तिने आपली मतं मांडली होती. कंगना रनौतचे ट्विटरवर लाखो फॉलोअर्स होते. सुरुवातील क्वीन कंगना या नावाने सुरू झालेले तिचे अकाऊंट नंतर कंगना रनौत या नावाने व्हेरिफाईड झालं होतं. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर तिने वादग्रस्त वक्तव्यं करण्यास सुरूवात केली. तिने आपल्या ट्वीट्सच्या माध्यमातून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरतीही टीका केली होती. दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनातील हिंसाचारानंतर तिने आंदोलकांना खलिस्तानवादी म्हटलं होतं. त्यानंतर तिने आपला मोर्चा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे वळवला. कंगनाने थेट  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका सुरू केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram