Sushant Singh Death Case : सुशांत सिंहचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला एनसीबीकडून अटक
नार्कोटिक्स ब्युरो कंट्रोल अर्थात एनसीबीनं शुक्रवारी सिद्धार्थ पीठानी याच्यावर कारवाई करत त्याला हैदराबादमधून अटक केली. ज्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणलं जाणार आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला जोडून सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणातील चौकशीअंतर्गत त्याच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली हा तपास सुरु होता आणि आता साधारण वर्षभरानंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा मॅनेजर असणाऱ्या सिद्धार्थला षडयंत्र रचल्याचं कारण देत अटक केली आहे.