Nitin Desai Death : Bollywood ला भरजरी करणाऱ्या देसाई यांचा सेलिब्रिटींना विसर

कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण ज्या नितीन देसाईंनी आपल्या प्रतिभेनं अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांची फ्रेम न फ्रेम जिवंत केली, त्या हिंदी चित्रपटांच्या दुनियेतल्या आमिर खान, आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर आणि संजय लीला भन्साळी यांच्याखेरीज एकही सेलिब्रिटी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित नव्हता. त्यामुळं बॉलिवूडला भव्यतेचं कोंदण देणाऱ्या, सिनेमाच्या पडद्याला श्रीमंत आणि भरजरी बनवणाऱ्या नितीन देसाईंचा बॉलिवूडला इतक्या लवकर विसर पडलाय का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. आधीच बॉलिवूडनं देसाईंना बॉयकॉट केल्याचा आरोप होतोय. त्यापाठोपाठ आता नितीन चंद्रकांत देसाईंना अखेरचा निरोप देण्यासाठीही बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजनी पाठ फिरवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola