ED Summons Nora Fatehi : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोरा फतेही ईडीच्या रडारवर, चौकशीसाठी कार्यालयात हजर

Continues below advertisement

ED Summons Nora Fatehi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगणा आणि अभिनेत्री नोरा फतेहीला ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस बजावली आहे. त्यात नोराला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.  सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटीही ईडीच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला ईडीनं नोटीस बजावली आहे. आज नोरा चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram