Dilip Kumar : श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
Dilip Kumar : श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी प्रकृती अस्वास्थामुळे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत एबीपी न्यूजला माहिती दिली.
त्या म्हणाल्या की, "दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यामुळेच त्यांना आज सकाळी साडेआठ वाजता मुंबईतील खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ. नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुम्ही सर्वजण त्यांच्यासाठी प्रार्थना करा की, ते लवकर ठिक होवोत."