Aamir Khan-Kiran Rao divorce : आमिर खान आणि किरण राव यांच्या लव्ह स्टोरीचा 'दी एन्ड'

Continues below advertisement

बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रोजेक्टवर एकत्रित काम केलं आहे. आम्ही दोघं विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही  एकत्रित राहू असं या दोघांनी म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram