NCB Investigation | दीपिका,श्रद्धा,सारावर कशी कारवाई होऊ शकते? विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम माझावर
ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे. ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.
NCB ने समन्स बजावल्यामुळे सारा अली खान आज त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. आज सकाळी दहा वाजता ती आपल्या जुहू येथील बंगल्यातून NCB कार्यालयाकडे रवाना होणार आहे. तिच्या जुहू येथील बंगल्यासमोर आज पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. जुहू येथील बंगल्यातून रवाना झाल्यानंतर ती काही वेळातच NCB च्या कार्यालयात पोहोचेल आणि अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईल.