Aditya Chopra on Sushant Suicide | पानी सिनेमावरून सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हता - आदित्य चोप्रा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत दोन डझनपेक्षा जास्त अधिक लोकांचा जबाब नोंदवला आहे. त्यामध्ये त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, दिग्दर्शक संजय लीला भन्साली, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा तसंच सुशांतच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. आता बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या प्रॉडक्शन बॅनरपैकी असलेल्या यशराज फिल्म्सचे मालक आणि निर्माते आदित्य चोप्रा यांची पोलिसांनी तब्बल चार तास चौकशी करुन जबाब नोंदवला. पोलिसांनी शुक्रवारी सुशांत सिंह राजपूतचा उपचार करणाऱ्या डॉ. केरसी चावडा यांचाही जबाब नोंदवला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola