Ashalata Wabgaonkar Passes Away | नाट्य आणि चित्रपटसृष्टीची न भरुन येणारी पोकळी : अशोक सराफ
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झाले असून साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर गेले चार दिवस उपचार सुरू होते. आई माझी काळूबाई या सिरियलचे शुटिंग सुरू असताना त्यांना लागण झाली होती. आशालता वाबगावकर यांच्याव्यतिरिक्त सेटवरील इतर 27 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेले चार दिवस आशालता वाबगावकर यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरू होते. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. जवळपास 40 हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.