Asha Parekh Special Report: बाल कलाकार ते दादासाहेब फाळके पुरस्कार, आशा पारेख यांची संपूर्ण कारकीर्द

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना केंद्र सरकारचा मनोरंजन क्षेत्रातला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसिद्धीमाध्यमांना ही माहिती दिली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. ‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. आशा पारेख यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी येत्या 30 सप्टेंबरला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola