Amitabh Bachchan Injured : मेगास्टार अमिताभ बच्चन यांना शूटिंग दरम्यान दुखापत

मेगास्टार अमिताभ बच्चन यांना शूटिंग दरम्यान दुखापत झालीये.. त्यांच्या बरगड्यांना गंभीर इजा झाली आहे.. प्रोजेक्ट के या चित्रपटासाठी बच्चन अनेक दिवसांपासून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये शूटिंग करतायेत. शनिवारी दुपारी एका शॉट दरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली.. हैदराबादमध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना एअर अॅम्बुलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं.. सध्या ते त्यांच्या जलसा या निवासस्थानी आराम करतायेत.. बरं होण्य़ासाठी काही आठवडे लागणार आहेत, तोपर्यंत सगळं काम त्यांनी स्थगित केलंय. बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवरून स्वतःच ही सगळी माहिती दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola