Adipurush Movie : काठमांडूमध्ये आदिपुरुष चित्रपटावर बंदी , सीतेच्या जन्मस्थळाचा वाद : ABP Majha
आदिपुरुष चित्रपटावरून निर्माण होणारे वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयते. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. याला करण ठरलाय सीतेच्या जन्म्थळाचा वाद. नेपाळ सरकार मते, सीतेचा जन्म नेपाळच्या तराई प्रदेशातील जनकपूर इथं झाला होता. तर सीतेचा जन्म बिहारच्या सीतामढी इथे झाला असं भारतात मानलं जातं. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये नेहमीच वाद होत आले आहेत. दरम्यान, काठमांडूमध्ये केवळ आदिपुरुष नाही तर सर्वच भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे.