Bigg Boss 14 Winner | अभिनेत्री रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती, राहुल वैद्यसोबत टक्कर!

Continues below advertisement

Bigg Boss 14 : Rubina Dilaik बिग बॉस 14 ची विजेती बनली आहे. सोशल मीडियावर आधीच याबाबत शक्यता व्यक्त केली जात होती की यावेळची विजेती Rubina Dilaik असेल आणि तसंच झालं. राहुल वैद्यला पराभूत करत तिने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. राहुल वैद्य बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे तर निक्की तांबोळी दुसरी उपविजेती ठरली आहे.

या सीजनमध्ये रुबीना दिलक पहिल्या दिवसापासून सर्वोत्कृष्ट खेळ खेळताना दिसली. घराच्या प्रत्येक विषयावर तिने उघडपणे आवाज उठविला होता आणि सुरुवातीपासूनच खेळाच्या दरम्यान तिची पर्सनॅलिटी पाहून तिला प्रबळ दावेदार मानलं जात होतं. कुठल्याही मुद्द्य़ावर कसलाही संकोच न बाळगता ती तिचं मत देत असे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तिने सलमान खानशीही पंगा घेतला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram