Sonu Sood | अभिनेता सोनू सूद आयकरच्या निशाणावर, APCO इन्फ्राटेक कंपनीसोबतचा व्यवहार भोवणार

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  आयकर विभागाने सोनू सूदवर 20 कोटींचा टॅक्स चोरीचा आरोप करत त्याच्या चॅरिटी ट्रस्ट द्वारे विदेशी निधी अधिनियम अॅक्ट नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी आता सोनू सूदची चौकशी ईडी, सीबीआयसह गृहमंत्रालयाच्या एफसीआरए डिव्हिजन देखील करणार असल्याची शक्यता आहे.  आयकर विभागाकडून सांगण्यात आलं आहे की, सोनू सूदच्या लखनौ स्थित एका कंपनीवर देखील छापेमारी करण्यात आली आहे. अद्याप यासंदर्भात सोनू सूदनं मात्र आपली बाजू मांडलेली नाही.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola