Ramayana मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या Arvind Trivedi यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Continues below advertisement

Arvind Trivedi Passed Away : 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका 'रामायण'मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी एबीपी न्यूजसोबत फोनवरुन झालेल्या संभाषणात अरंविद त्रिवेदी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, "अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. गेल्या 3 वर्षांपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करत होते. अशातच दोन ते तीन वेळा त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं. साधारणतः महिन्याभरापूर्वी ते उपचारानंतर घरी परतले होते. मंगळवारी रात्री 9 ते 9.30 दरम्यान त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळं मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला." तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, "अरविंद त्रिवेदी यांच्यावर सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram