Govinda Gun Fire : गोविंदा... मिसफायर आणि टाइमलाईन ; संपूर्ण घटनाक्रम एका क्लिकवर

Continues below advertisement

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा हे मंगळवारी पहाटे त्यांच्याच पिस्तुलामधून सुटलेली गोळी लागू जखमी झाले होते. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना रक्तबंबाळ अवस्थेत जुहू येथील क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करुन गुडघ्यात शिरलेली गोळी बाहेर काढण्यात आली. त्यानंतर गोविंदा (Actor Govinda) यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, गोविंदा यांच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी नेमकी (Gun firing) कशी सुटली, याविषयी अनेकांना प्रश्न पडला होता. त्याचे कारण आता समोर आले आहे. पोलिसांनी गोविंदा यांच्याकडी पिस्तुल ताब्यात घेतले होते. त्याची तपासणी केल्यानंतर गोविंद यांच्या रिव्हॉल्व्हरच्या लॉकचा लहानसा भाग तुटल्याचे दिसून आले. याच कारणामुळे गोविंदा यांच्या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, गोविंदा हे मंगळवारी पहाटे 5:45 वाजताच्या विमानाने कोलकाता येथे जाणार होते. त्यासाठी ते साडेचार वाजता तयार होऊन घरातून बाहेर पडणार होते. गोविंदा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडली तेव्हा जुहू येथील घरात त्यांच्यासोबत मुंबई पोलिसांकडून पुरवण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांपैकी एकजण उपस्थित होता. गोविंदा पहाटे घराबाहेर पडत होते तेव्हा ते त्यांच्या कपाटात एक सुटकेस ठेवत होते. तेव्हा कपाटातील रिव्हॉल्व्हर खाली पडली आणि त्याच्यातून गोळी सुटली. 

गोविंदा यांच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि पोलीस कंट्रोल रुमला घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोविंदा यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमध्ये एकूण सहा गोळ्या होत्या. ही बंदूक लोड करुन ठेवण्यात आली होती. पोलिसांनी बंदुकीचा परवाना तपासून पाहिला, तो वैध आहे. ही रिव्हॉल्व्हर खूप जुनी आहे. गोविंदा यांना नवीन रिव्हॉल्व्हर विकत घ्यायची होती. मात्र, त्यापूर्वीच हा अपघात झाला.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram