Aai kute Kay karte मालिकेत अनुष्काची एन्ट्री, अनुष्कासोबत खास गप्पा : ABP Majha
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आशुतोषच्या वाढदिवशी अरुंधती आशुतोषच्या बाबतीतला सर्वात मोठा निर्णय घेणार होती. मात्र अनुष्काच्या एण्ट्रीने अरुंधतीला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा लागणार आहे. अनुष्का म्हणजेच आशुतोषची खूप जुनी मैत्रीण. बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट होणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.