Aaditya Thackeray Ambani Wedding:रजनीकांत ते तेंडुलकर..अंबानींच्या लग्नात आदित्यच्या शेजारी कोणकोण?

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांला धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज मुंबईत शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी अनंत-राधिका या नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावली.

अनंत-राधिका नवदाम्पत्याला पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद

पंतप्रधान मोदी यांनी नवीन जोडप्याला आशीर्वाद देतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. अनंत आणि राधिकाच्या आशीर्वाद समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पोहोचले. या कार्यक्रमाला पोहोचलेल्या पंतप्रधानांचं अंबानी कुटुंबाने भव्य स्वागत केलं. 

अनंत-राधिकाचा 'शुभ आशीर्वाद' सोहळा

अनंत-राधिकाच्या 'शुभ आशीर्वाद' सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यासोबतच बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, शाहिद कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासह देश-विदेशातील सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. अमेरिकन रिॲलिटी टीव्ही पर्सनॅलिटी किम कार्दशियन आणि तिची बहीण क्लो कार्दशियन यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola