#INDvsSL | 'जस्टिस फॉर काश्मीर'चे बॅनर असलेल्या हेलिकॉप्टरच्या स्टेडियमभोवती घिरट्या | ABP Majha

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. लीड्सच्या मैदानात सुरु असलेल्या या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने इंग्लंडमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. या सामन्यादरम्यान एका विमानाने अवकाशात पाच घिरट्या मारल्या. विमानातून एक बॅनर बाहेर झळकत होता आणि त्यावर 'जस्टिस फॉर काश्मीर' असे इंग्रजीत लिहिण्यात आले होते. ते विमान कोणाचे होते? त्यात कोण व्यक्ती होत्या? याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु आयसीसी आणि स्थानिक पोलिसांनी ही घटना खूपच गांभीर्याने घेतली आहे. या घटनेमुळे इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याआधी भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्ये लोकांची ये-जा वाढल्यामुळे बीसीसीआयने आयसीसीकडे भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज घडलेल्या घटनेनंतर बीसीसीआय आणि आयसीसी भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी कोणती पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram