Mahajanadesh Yatra | औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी आकड्यातून वीज चोरी | ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी वीजचोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय. भाजपची महाजनादेश यात्रा औरंगाबादमध्ये पोहोचलीय. आज तिथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार असून त्या सभेसाठी लागणारी वीज ही आकडा टाकून घेण्यात आलीय. औरंगाबादमधल्या सांस्कृतिक मंडळ मैदानावर ही सभा पार पडणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून मोठा मंडप उभारण्यात आलाय. मात्र या सभेला लागणारी वीज चक्क चोरीची असल्याचं कळतय.
Continues below advertisement