Nagpur MLC Election | नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? मतमोजणी सुरू

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 2 लाख 6 हजार 454 मतदारांपैकी 1 लाख 32 934 म्हणजेच 64.38 टक्के मतदारांनी मतदान केले. आज सकाळी 8 वाजल्य़ापासून मतमोजणी सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा कुणाला आणि मतदारांचा कौल कुणाला याची उत्सुकता लागली आहे. एकूण 19 उमेदवार रिंगणात असून 28 टेबलवर मतमोजणी होणार असून पाच फेऱ्या होणार आहेत. सुरुवातीला 25 - 25 मतांचे bunch बनविले जाणार असून त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. मोजणीच्या 5 फेऱ्यांमध्ये वैध मतांपैकी पहिल्या पसंतीच्या मतांची सुरुवातीला मोजणी करण्यात येणार आहे. त्यात समोर असलेल्या उमेदवाराने ठरलेला कोटा पूर्ण केला तर दुसऱ्या पसंतीचे मत मोजले जाणार नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola