Punjab Elections : AAPच्या पंजाबमधल्या यशाचं गमक काय? ABP Majha

Punjab Election Results 2022 LIVE : पंजाबमध्ये आम आदमी पक्ष पहिल्यांदाच आपले सरकार स्थापन करणार आहे. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले भगवंत मान यांनी ऐतिहासिक विजयानंतर शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले आहे. 

शहीद भगतसिंग यांचे पंजाबमधील खटकरकालन हे गाव आहे. पंजाबमधील आपच्या यशानंतर भगतसिंग यांच्या खटकरकालन या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण सोहळा होईल आणि तेथेच भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान, पंजाबमध्ये विजय मिळवल्याबद्दल आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांना फोन करून त्यांचे आणि पक्षाच्या विजयाचे अभिनंदन केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola