Waris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!

Continues below advertisement

Waris Pathan Emotional During Prachar Rally: राज्यात विधानसभा निवडणुकांचा (Vidhan Sabha Election 2024) धुरळा उडणार आहे. अशातच आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यापूर्वी काल प्रचाराचा सुपरसंडे होता. अनेक दिग्गजांनी मतदारराजाला साद घातली. तर, भिवंडी पश्चिम मतदारसंघातील (Bhiwandi West Constituency) एमआयएमचे उमेदवार (MIM Candidate) वारिस पठाण (Waris Pathan) मात्र, प्रचार रॅलीज भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांनी केला आहे. जाणीवपूर्वक प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जात असल्याचं म्हणत वारिस पठाण भावूक झाले. 

विरोधक आपल्याला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत भिवंडी पश्चिम मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण रडले. आपण इथे सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी आलोय. परंतु जाणीवपूर्वक आपल्या प्रचार रॅलीला परवानगी नाकारली जाते. प्रचारात वाहनं घुसवली जातात. भाजपला आपणच हरवू शकतो, हे माहीत असल्यानं भाजपसह सर्व विरोधी उमेदवार एकत्र आले आहेत, असं वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. तसेच, आपल्याला सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा असून विजय आपलाच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram