Gadchiroli Gram Panchayat Elections : गडचिरोली,गोंदिया नक्षलग्रस्त भागात 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ
abp majha web team
Updated at:
05 Nov 2023 11:52 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय. तर २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार . तर मतमोजणी उद्या होणार आहे. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे.