बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या होणार मतदान, एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Continues below advertisement

Belgaum : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत  मतदान होणार आहे. मतदानासाठी सगळी तयारी पूर्ण झाली असून निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि आवश्यक साहित्य बी के मॉडेल हायस्कूल येथे वितरित करण्यात आले. बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण 58 प्रभागांसाठी मतदान होईल तर एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram