Pandharpur By Election Results 2021 : पंढरपूर पोटनिवडणूक मतमोजणी आज; राष्ट्रवादी बाजी मारणार?
पंढरपूर मंगळवेढ्याचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता पंढरपूर येथील शासकीय गोदामात सुरु होणार आहे. कोरोनाच्या संकटामध्ये 24 ऐवजी एकूण 38 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होत असल्याने निकाल येण्यास उशीर होणार असला तरी मतमोजणीच्या कल दुपारी बारापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार असला तरी मुख्य लढत ही भाजपचे समाधान अवताडे आणि राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्यात होणार आहे. ही झलेली निवडणूक अतिशय अटीतटीची झाल्याने मतमोजणीतही काट्याची टक्कर शेवटच्या फेरीपर्यंत राहायची शक्यता आहे.
या निवडणुकीत एकूण 2 लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले होते. याशिवाय ८० वर्षावरील व दिव्यांग आदी 3252 मतदारांनी पोस्टाने मतदान केले आहे. याशिवाय 73 सैनिकांनी देखील पोस्टाने आपला मतदानाचा हक्क बजावला असून सकाळी आठपर्यंत सैनिकांची येणारे पोस्टाची मतदान गृहीत धरली जाणार आहेत.