Assembly Election Results 2021 : Election Results 2021 : पाच राज्यांचा रणसंग्राम; कोण मारणार बाजी?

Continues below advertisement

Election Results 2021 LIVE: देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणांत सुरुवात होणार असून, देशाच्या राजकीय पटलावर यामुळं मोठ्या घडामोडी घडणार असल्याची अपेक्षा अनेक राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता आसाम, केरळ, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदार राजानं नेमका कोणाला कौल दिला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मतमोजणीच्याच पार्श्वभूमीवर निव़डणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेसाठी 822 आरओ आणि 7000 एआरओंची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, 2364 केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या सुरु असणाऱ्या कोरोना संसर्गाची लाट पाहता कोणीही व्यक्ती, एजंट यांना मतमोजणी केंद्रावर आरटीपीसीआर चाचणी किंवा कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याच्या निश्चिततेशिवाय आत घेतलं जाणार नाही. 

दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट ओढावलेलं असतानाच पार पडलेल्या या निवडणुकांसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून कैक बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत मतदारांना अनेक आश्वासनं देऊ केली होती. काही भागांमध्ये या प्रक्रियेतही गालबोट लागण्याच्या घटना घडल्या. सरतेशेवटी संकटाला दूर लोटत करण्यात आलेल्या या प्रचाराचा मतदारांवर नेमका काय आणि किती परिणाम झाला आहे हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram