Maharashtra Election : संयम ठेवल्यास पक्ष योग्य वेळी संधी देतो : Chandrashekhar Bawankule :ABP Majha

Continues below advertisement

भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बावनकुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईत आले आहेत, यावेळी, विधान परिषदेची निवडणूक जिंकून विधिमंडळात ओबीसी आरक्षण आणि ऊर्जा खात्यातील बट्ट्याबोळ या विषयी प्रश्न मांडणार असल्याचे बावनकुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहे, तसेच संयम ठेवल्यास पक्ष योग्य वेळी संधी देतो, यामध्ये कुठेही नाराजी ठेवायचे कारण नसते, असेही बावनकुळे यांनी सांगितले आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram