Karnataka Elections Jaynagar : जयनगर विधानसभेत काटे की टक्कर, 18 मतांनी भाजपच विजय ABP Majha

वर्षानुवर्षे भाजपाची जागा असलेल्या दक्षिण बेंगलरूमधील जयनगर विधानसभा मतदारसंघ याही वेळा लक्षवेधी ठरला आहे. अत्यंत काट्याच्या टक्करीमध्ये ही जागा भाजपाने 18 मतांनी जिंकली. या आणि बंगळुरूमधील अन्य ५ मतदारसंघांची जबाबदारी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर होती. त्यांच्या सोबत मुंबई भाजपाची एक टीमने प्रचंड मेहनत घेतली. 
२०१८च्या निवडणुकीत ही जागा भाजपच्या विजयकुमार यांनी जिंकली होती.. मात्र त्यांचा प्रचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतरच्या फेरनिवडणुकीत काँग्रेसनं ही जागा अत्यंत कमी फरकानं जिंकली. यंदा या जागेची जबाबदारी शेलार यांच्यावर होती, आणि १८ मतांनी का होईना, पण जयनगर मतदारसंघ पुन्हा भाजपकडे आला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola