Karnataka Assembly Election Result Live : काँग्रेसच्या विजयी आमदारांना बंगळुरूत आणणार

Continues below advertisement

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Assembly Election 2023) निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहेत. निकालापूर्वीच्या कलानुसार काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आज (13 मे) सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरु झाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त जेडीएसमध्ये चुरशीची लढत होती.

कलांनुसार कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं दिसतं. काँग्रेस इथे सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसने सत्ता स्थापन केली तर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार आघाडीवर आहेत.

मात्र सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरुन त्यांच्यात आणि शिवकुमार यांच्यात मतभेद आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, "काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. पण आपण दावेदार आहोत.

विशेष म्हणजे काँग्रेस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कधीच उघड न करण्याचा प्रघात काँग्रेसमध्ये आहे, विशेषत: कर्नाटकात. ही एक अतिशय लोकशाही प्रक्रिया आहे जी वर्षानुवर्षे सुरु आहे. बहुमत मिळवून पक्ष सत्तेवर आल्यास निवडून आलेले आमदार प्रथम आपलं मत मांडतील, त्यानंतर 'हायकमांड' निर्णय घेतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram