Karnataka Assembly Election Result Live : कर्नाटकमध्ये कॉंग्रेस बहुमताच्या जवळ : ABP Majha
कर्नाटक विधानसभेचा निकाल आज जाहीर होणार आहे... कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याचा फैसला काही तासांवर आलाय...कर्नाटकातील 224 जागांचा पूर्ण निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे... थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल... कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे आज ठरेल... एक्झिट पोलच्या निकालात भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. बहुतांशी एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 110 ते 140 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे सत्ताधारी भाजपची चिंता वाढलीये.. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर 2024 च्या निवडणुकीत 'मिशन 400' समोर अधिक आव्हानं निर्माण होतील. त्यामुळे कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरणार आहे...तर जनता दलाच्या किती जागा येतात याकडेही लक्ष लागलंय.. त्यामुळे आता कर्नाटकातील जनता कुणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...