Karnataka Assembly Election 2023 : निकालांच्या पार्श्वभुमीवर HD Kumarswamy मंदिरात ABP Majha

Continues below advertisement

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या (Karnataka Assembly Election 2023) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा गाठला आहे. त्यापाठोपाठ भाजप (BJP) आणि जेडीएस (JDS) यांचा क्रमांक आहे. कलांमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असला तरी स्थिर सरकारसाठी काँग्रेसला जेडीएसची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरु केल्या आहेत. दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्व देखील जेडीएसचे प्रमुख एचडी कुमारस्वामी यांच्या संपर्कात असून बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जेडीएस या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. 

जेडीएस हा कर्नाटकमधील प्रादेशिक पक्ष आहे. जेडीएस प्रमुख एच डी कुमारस्वामी कर्नाटकातील चन्नापट्टन विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. कुमारस्वामी यांचा विजय रथ रोखण्यासाठी भाजपने सीपी योगेश्वर यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने गंगाधर एस. यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. विशेष म्हणजे एचडी कुमारस्वामी पिछाडीवर आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram