Election Commission केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक, पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत काय निर्णय?
Continues below advertisement
उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक होणार आहे. एकीकडे देशात कोरोनाचा विस्फोट होतोय आणि दुसरीकडे पाच राज्यांतील विधानसभांची मुदत संपतेय. सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणूक वेळेवर घ्यावी असा आग्रह धरल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे निवडणुका वेळेवर होणार का हा प्रश्न आहेच. शिवाय जाहीर सभा आणि रोड शोवर निर्बंध घातले जातील अशी माहितीही आयोगाच्या सूत्रांनी कालच दिली होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.
Continues below advertisement