Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!
Continues below advertisement
Devendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच! Devendra Fadnavis मुंबई: मुंबईत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आता विधिमंडळ पक्ष बैठकीत संमत होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या बैठकीत निरीक्षक म्हणून इथे आलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन देखील उपस्थित होते.
Continues below advertisement