Belgaum Election : बेळगावमधील पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा
बेळगाव : राहुल गांधींचे आजोबा असताना चीनने आपल्या जागा घेतल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला सांगितलं हा पूर्वीसारखा भारत नाही. तिथून चीनला परत पाठवण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं. एक इंच देखील जमीन दिली नाही, हा कमजोर भारत नाही, हे त्यांनी दाखवून दिलं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.