BJP Mission 45 Loksabha : भाजपनं मिशन 45 अंतर्गत 'या' मतदारसंघांची केली निवड

Continues below advertisement

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने (BJP)  कंबर कसली आहे. पवारांचं प्राबल्य असलेल्या बारामतीवर भाजपने विशेष लक्ष दिले आहे. 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर जाणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक स्थितीचा आणि कामांचा आढावा घेणार आहेत.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांना समोर ठेवत भाजपचं मिशन 45 सुरू केले आहे. या मिशनची सुरुवात पवाराचे प्राबल्य असलेल्या बारामती येथून झाली आहे.  महाराष्ट्रातल्या 16 मतदारसंघांत केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत त्या अंतर्गत निर्मला सीतारामन बारामतीला जाणार आहेत.  तर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा 11 ते 13 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

भाजपाच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने 16 मतदारसंघ निवडले आहेत. त्यापैकी दहा मतदारसंघ शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram