Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

Continues below advertisement

Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
मी नाराज नाही पण योग्य वेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी आहे, कार्यकर्त्यांचा आवाज होण्याची जबाबदारी निश्चित माझी आहे आणि मी ती व्यवस्थितपणे वठवतो.. पक्षाने मला जेव्हा जेव्हा शक्ती दिली तेव्हा मी कामाच्या माध्यमातून पक्षाची प्रतिष्ठा वाढावी यासाठी काम केलं  .. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी नाराज कशाला असेल नाराजी जनतेत असेल, मंत्रीपद येतं आणि जातं, मुख्यमंत्री पद ज्यांचं आहे त्यांचंही येणार आहे जाणार आहे, परमनंट कोणीच नाही, फक्त आमचं काम आहे उत्तमोत्तम काम करायचं ..  बावनकुळे साहेबांना असं वाटणं योग्य आहे, मदत त्यांची शक्ती कमी झाली होती तेव्हा मात्र मी जे म्हणालो ते तेव्हा त्यांनाही वाटत होतं ..शोभाताई काही आता भाजपच्या पदाधिकारी नाहीयेत, त्यांच्याकडे कुठली जबाबदारी नव्हती त्यांनी कुठली सभा घेतली नाही त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात त्या गेल्या असतील मला वाटत नाही, त्या काकू आहेत कुटुंबाचे प्रश्न म्हणून गेल्या असतील.. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की मी त्यांना भेटावं, त्यांचं मत जाणून घ्यावं, त्यामुळे भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ही जबाबदारी आहे, आम्हीही या पक्षाच्या विस्तारात आपलं आयुष्य दिलं आहे, कार्यकर्त्यांचा सूर काय आहे हे भेटल्यावरच कळेल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola